शांताराम चव्हाण : लढवय्याच्या सत्काराचा दुर्मीळ योग
आज त्यांचे वय ८० वर्ष आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे पाय लंगडतो आहे, पण हृदयातील अंगार जागा आहे. जागतिकीकरणाच्या लाटेने आता सर्वच जण भारावलेले आहेत. मध्यम व उच्च वर्गाला पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या कष्टकऱ्यांच्या किंकाळ्या ऐकूही येत नाहीत. त्या ऐकू येऊ नयेत, यासाठी एक भ्रामक जाल आपल्या भोवताली विणले जाते आहे. अशा वेळी शांताराम चव्हाण मात्र ‘मॅट्रिक्स’ सिनेमामधील मॉर्फससारखे एकाकीपणे लढत आहेत.......